पश्चिम बंगालमध्ये इसिस सरकार? भाजपचा ममतादिदींवर हल्लाबोल

817

पश्चिम बंगालमधील मदिनापोर येथे एका भाजप कार्यकर्त्याचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या कार्यकर्त्याची हत्या तृणमूल काँग्रेसकडून घडवून आणल्याचा आरोप भाजपने केला आहे. या हत्येनंतर भाजपने ममता दिदींना फटकारले असून तृणमूल काँग्रेसची तुलना इसिससोबत केली आहे.

मदिनापोर जिल्ह्यातील दानतान भागातील बर्शा हांसडा या भाजर कार्यकर्त्याची निर्घृणरित्या हत्या करण्यात आली आहे. या कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला टांगून ठेवण्यात आला होता. पश्चिम बंगाल भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्या हत्येचे फोटो टाकत भाजपने तृणमूलवर निशाणा साधला आहे. यात त्यांनी भाजपवर टीका करणाऱ्या उदारमतवाद्यांना देखील फटकारले असून या हत्येवर शांत का? असा सवाल देखील केला आहे.

भाजपचे नेते अर्जुन सिंग यांनी देखील या हत्येवरून तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘तृणमूल काँग्रेस व इसिसमध्ये काय फरक आहे? निष्पाप जीवांची हत्या करून अशाप्रकारे 2021 ची निवडणुक लढवली जाणार आहे का? ममता बॅनर्जींच्या पक्षासोबत न गेल्याने ही अशी अवस्था होणार आहे का?’असे ट्विट अर्जुन सिंग यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या