वा रे.. पार्टी विथ डिफरन्स, भाजपच्या लाचखोर नगरसेविकेला पाच वर्षे कारावास; पाच लाखांचा दंड

1422

भाजपच्या ‘पार्टी किथ डिफरन्स’ आणि पारदर्शक कारभाराचा ढोल साफ फुटला आहे. मीरा-भाईंदर येथील लाचखोर भाजप नगरसेविका वर्षा भानुशाली हिला ठाण्याच्या सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिने अधिक कारावासाची शिक्षाही भानुशाली हिला भोगावी लागणार आहे.

भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपूतील ओळखली जाणारी वर्षा भानुशाली ही राई-मुर्धा-मोरवा भागातील भाजपची नगरसेविका आहे. 2012 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत ती निवडून आली होती. भाईंदर पूर्व येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या  गाळ्याची उंची वाढवली म्हणून तिने गाळे मालकाकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत ही रक्कम 1 लाख 60 हजार रुपये इतकी ठरली. 6 जून 2014 रोजी गाळे मालकाकडून 50 हजारांचा पहिला हप्ता घेताना तिला भाईंदर पश्चिम येथील जानकी हेरिटेज या इमारतीतील घरातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपने तिला पुन्हा तिकीट दिले व ती निवडून आली होती. भानुशाली हिच्या लाचखोरीचा खटला ठाणे सत्र न्यायालयात सुरू होता.

मेहतांचा कधी लागणार?

अशाच स्करूपाच्या  एका लाच प्रकरणात भाजपचे माजी आमदार तथा तत्कालीन नगरसेकक नरेंद्र मेहता यांना 22 डिसेंबर 2002 रोजी रंगेहाथ पकडण्यात आले होते. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आजही खटला उभा आहे. त्यामुळे नगरसेविका वर्षा भानुशालीचा तर निकाल लागला, आता नरेंद्र मेहता यांचा निकाल कधी लागणार, अशी चर्चा येथे सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या