माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांचे कॉंग्रेसमध्ये घरवापसी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपाचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी स्वगृही म्हणजेच कॉंग्रेसमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार डॉ. सुनील देशमुख 19 जून रोजी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. मुंबई कॉंग्रेसच्या टिळक भवन नुतनीकरणाच्या कार्यक्रमाला खासदार राहुल गांधी येणार असून त्यांच्या उपस्थितीत डॉ. सुनील देशमुख प्रवेश करणार आहेत.

डॉ. देशमुख 2004 मध्ये अमरावती विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्री मंडळात ते अर्थमंत्री होते. दरम्यान, पुढे झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांची उमेदवारी कापण्यात आली होती. व रावसाहेब शेखावत यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यामुळे डॉ. देशमुख कॉंग्रेसवर नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला होता. त्यानंतर नितीन गडकरींच्या मध्यस्थीने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व विजयी सुध्दा झाले होते. यावेळी सुध्दा ते भाजपचे उमेदवार म्हणून अमरावती मतदार संघातून उभे होते. मात्र काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनी त्यांचा पराभव केला होता. अशी सर्व पार्श्वभूमी असलेले डॉ. देशमुख पुन्हा आपली घरवापसी करणार आहेत. दरम्यान, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नुकतेच अमरावतीच्या दौ-यावर येवून गेले या भेटीतच सुनील देशमुख यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला.