
सामना ऑनलाईन । भोपाळ
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी सकाळी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपकडून भोपाळ मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. या मतदारसंघातून त्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना काँटे की टक्कर देणार आहेत. भाजपच्या या खेळीमुळे काँग्रेसच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
BJP releases list of four candidates for #LokSabhaElections2019 in Madhya Pradesh; Sadhvi Pragya Singh Thakur to contest from Bhopal against Congress’s Digvijaya Singh. pic.twitter.com/mSiSX8Xfsz
— ANI (@ANI) April 17, 2019
साध्वी प्रज्ञा व दिग्विजय सिंह यांना एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाते. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी यांना अटक झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी ‘हिंदू दहशतवाद’ अशी टीका त्यांच्यावर केली होती. त्यामुळे हे दोघे कट्टर विरोधक एकमेकांविरोधात लढत असल्यामुळे ही लढत नक्कीच रंगतदार होणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी त्या निवडणूकीसाठी तयार असून आता त्याच्याच कामाला लागले असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.
Sadhvi Pragya Singh Thakur, BJP on her candidature from Bhopal, MP in #LokSabhaElections2019 : Hum tayar hain, ab ussi karya mein lag gayi hun. pic.twitter.com/16PE5OcVSG
— ANI (@ANI) April 17, 2019
भाजपने आज चार उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात साध्वी प्रज्ञा यांना भोपाळ, केपी यादव यांना गुणा, रमाकांत भार्गव यांना विदीशा आणि राज बहादूर सिंग यांना सागर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.




























































