भाजप मोदींच्या नेतृत्वाखाली CAA मुद्यावर दिल्लीत निवडणुका लढवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप दिल्लीत मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असून ही निवडणूक भाजप नागरिकत्व सुधारित कायद्याच्या मुद्द्यावर लढवणार आहे. तसेच  भाजप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार नाही.

इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. दिल्लीसाठी भाजप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देण्याची शक्यता नाही. तसेच ही निवडणूक नागरिकत्व सुधारित कायद्याच्या मुद्द्यावर लढणार आहे. भाजपध्यक्ष अमित शहा यांनी तसे संकेत दिले आहे. दिल्लीत झालेल्या एका सभेत अमित शहा म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत नागरिकत्व कायदा मंजूर करून घेतला. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी जनतेची दिशाभूल केली. अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांनी दिल्लीत दंगली घडवल्या.” दिल्लीत दंगली घडवणारे सरकार तुम्हाला हवे का असा सवाल त्यांनी केला.

दलित, शीक आणि निर्वासितांच्या घरी जाऊन प्रचार करण्याचे आदेश अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना दिले. तसेच देशद्रोहींचा पर्दाफाश करण्याचे, केजरीवाल यांची खरी बाजू दाखवण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.