अजित पवार लबाड लांडग्याचं पिल्लू, गोपीचंद पडळकर यांची टीका

अजित पवार यांच्या गट मिंधे सरकारमध्ये सामिल झाला मात्र अद्यापही भाजप व मिंधे गटामधील अनेकांमध्ये त्यावरून धुसफूस सुरू आहे. दोन्ही गट व भाजप एकमेकांवर कायम टीका करत असतात. भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी धनगर आऱक्षणावरुन थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत’, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर टिकेची झोड उठवली. ”धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे.” अशी टीका गोपिचंद पडळकर यांनी केली आहे.