उत्तर प्रदेशमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

1109

उत्तर प्रदेशमध्ये भाजप नेत्याची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. संजय खोखर असे त्यांचे नाव असून त्यांनी जिल्ह्याचे अध्यक्षपद भुषवले होते. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 24 तासात आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

भाजपचे नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष संजय खोखर हे बागपत जिल्ह्यात राहत होते. मंगळवारी मॉर्निंग वॉकसाठी ते बाहेर पडले होते. घरापासून दीड किमी अंतरावर एका शेतात त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी खोखर यांचा मुलगा मनीष खोखरच्या तक्रारीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच मुख्यमंत्री यांनी आरोपींना 24 तासात शिक्षा देण्याचे आदेश दिले आहेत.

एका सर्वेक्षणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून गौरवण्यात आले होते. पण राज्यातील कायदा सुव्यवस्था सातत्याने ढासळत आहे. मंगळवारी एका तरुणीचा काही गुंड पाठलाग करत होते. त्यात अपघात झाल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या