
आग्रा येथील ताजमहल पार्किंगजवळ सोमवारी झालेल्या गोळीबारप्रकरणी भाजप नेता पंकज कुमार सिंहला अटक करण्यात आली आहे. पंकज सिंहने गोळीबार केल्यानंतर पोलिसांची नजर चुकून घटनास्थळावरून पळ काढला होता. तेव्हापासून पोलीस आरोपीच्या मागावर होते. लखनौ पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीला आग्रा पोलिसांच्या ताब्यात दिले.