मॅजिस्ट्रेटवर बंदूक रोखणाऱ्या भाजप नेत्याची आमदारकी रद्द

राजस्थान विधानसभेने भाजप आमदार कंवर लाल मीणा यांची आमदारकी आज रद्द केली. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांवर बंदूक रोखल्याप्रकरणी त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 20 वर्षे जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने त्यांना 21 मेपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी त्यांनी अकलेरा न्यायालयात आत्मसमर्पण केले.