दूध दरवाढीसाठी भाजपचे 1 ऑगस्टला आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp

महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून दुधाचे भाक 16 ते 18 रुपयांपर्यंत घसरले आहेत. या पार्श्वभूमीवर दूध दरवाढीसाठी 1 ऑगस्टला भाजप राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचे तातडीने पुनर्गठन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

दूध दरवाढीच्या या आंदोलनात रासप, रयत क्रांती, रिपाइं या संघटनाही या सहभागी होणार आहेत. आमचं आंदोलन हिंसक नसेल. अधिकाऱयांना दूध भेट देणे आणि परवानगी मिळाली तर देवाला दूध अर्पण करणे असं आंदोलनाचं स्वरूप असेल, अशी माहिती पाटील यांनी दिली. दरम्यान, आज सोमवारीही राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत घेण्यात आला.