
बंदोबस्तात असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी भंडारा जिल्ह्यातील भाजपचे आमदार चरण वाघमारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 18 सप्टेंबरला वाघमारे व तुमसर शहर भाजपाध्यक्ष अनिल जिभकाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Maharashtra: Charan Waghmare, BJP MLA from Tumsar has been arrested today for allegedly misbehaving with a woman police personnel on September 16. The case was registered on September 18.
— ANI (@ANI) September 28, 2019
16 सप्टेंबर रोजी तुमसर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमागील आवारात कामगार नोंदणी व साहित्य वाटप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात साहित्य कमी असल्याने या मेळाव्यात गोंधळ निर्माण झाला. या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलीस पोलीस उपनिरीक्षक रजनी तुमसरे घटनास्थळी आल्या व त्यांनी एका गरोदर महिलेला मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी तुमसरे व अनिल जिभकाटे यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर जिभकाटे व वाघमारे यांनी तुमसरे यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचे समजते. या प्रकरणी अनिल जिभकाटे व चरण वाघमारे यांच्याविरोधात भादंवि कलम 353, 354, 294, 504, 506 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
























































