गणपत गायकवाडचा कोठडीत अन्नत्याग, मिंधेंच्या दबावाने मुलावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप

जमीन व्यवहारात मांडवली फिस्कटल्याने उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यातच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड याच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात रोज नवीन ट्विस्ट निर्माण होत आहे. मिंधेंच्या दबावामुळेच पोलिसांनी आपल्या मुलावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत आमदार गणपत गायकवाड यांनी कळवा पोलीस ठाण्याच्या कोठडीतच अन्नत्याग सुरू केला. माझ्या निर्दोष असलेल्या मुलाचे नाव एफआयआरमधून वगळा, अशी मागणी ते सातत्याने करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

2 फेब्रुवारी रोजी हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनातच भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मिंधे गटाचा शहरप्रमुख महेश गायकवाडवर अंदाधुंद गोळीबार केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत पैद झाली. हल्ल्यानंतर 12 तासांच्या आतच गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल झाले. पोलीस ठाण्यातील गोपनीय फुटेज जगजाहीर झालेच कसे, असा सवाल गणपत गायकवाड यांच्या वकिलांनीही न्यायालयात उपस्थित केला होता. मुळात वैभव गायकवाड पोलिसांच्या कक्षातून बाहेर पडल्यानंतर गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याचे पॅमेऱयात पैद झाले. त्यामुळे वैभव हा या हल्ल्यादरम्यान उपस्थित नसतानाही पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाच कसा, असा आरडाओरडा करत पोलीस कोठडीतच गणपत गायकवाड ठिय्या देऊन बसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिसांच्या मिनतवारीनंतर चहा-बिस्कीट

राजकीय आकसातून मुलगा वैभव याच्यावर गुन्हा दाखल केल्याने कळवा पोलीस ठाण्याच्या कोठडीत गणपत गायकवाड यांनी अन्नत्याग केला. त्यामुळे पोलिसांची भंबेरी उडाली. मोठय़ा मुश्किलीने मिनतवाऱया करून त्यांची समजूत काढल्याचे समजते. त्यानंतर गायकवाड यांनी केळी, चहा, बिस्कीट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी चुप्पी साधली आहे.

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा निकटवर्तीय विकीला अटक

गोळीबारप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर गणपत गायकवाड, संदीप सरवणकर आणि हर्षल केणे या तिघांना अटक केली, तर या प्रकरणातील वैभव गायकवाड, विकी गणात्रा, नागेश बडेकर हे तिघे फरार होते. त्यापैकी विकी गणात्रा याला खंडणीविरोधी पथकाने आज अटक केली. विकी गणात्रा हा भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा निकटवर्तीय आहे.