राधाकृष्ण विखेंच्या संपर्क कार्यालयाच्या फलकावरून कमळ गायब, तर्कवितर्कांना उधाण

1261

मोठा गाजावाजा करुन भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी श्रीरामपुरात संपर्क कार्यालय सुरू केले. मात्र या कार्यालयाच्या फलकावरुन कमळ गायब झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विखे पाटील भाजपाला रामराम ठोकणार आहे का? कोणत्या पक्षात जाणार? यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

vikhe-patil

संपर्क कार्यालय सुरू करताना व्यासपीठाच्या मागे भाजपा नेते अथवा कमळाचे चिन्ह टाकणे आमदार विखे-पाटील यांनी टाळले आहे. विशेष म्हणजे कार्यालयाच्या फलकावरुनही कमळ गायब झाले आहे. कार्यालयात पद्मभुषण बाळासाहेब विखे-पाटील यांचाच फोटो आहे. तसेच यावेळी करण्यात आलेल्या भाषणातूनही विखे-पाटील यांनी भाजपच्या एकाही वरीष्ठ नेत्यांचा नामोउल्लेख केला नाही. तसेच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही या समारंभाकडे पाट फिरवल्याचे दिसले.

विखेंच्या श्रीरामपुरातील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनास पक्षविरहित स्वरूप होते. त्यातच तेथील एका फ्लेक्सवर ‘चलो एक पहल की जाए…नए रस्ते की ओर…’ असे एक वाक्य लिहिलेले होते. त्यावरून आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या