
संस्कृत भाषेत बोलण्याने मधुमेह व कॉलेस्टरॉल कमी होतो असा अजब दावा भाजपचे खासदार गणेश सिंह यांनी केला आहे. संस्कृती युनिव्हर्सिटी विधेयकावर चर्चा करताना त्यांनी हा दावा केला आहे. जगभरातील 97 टक्के भाषा या संस्कृतवर आधारित असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
‘अमेरिकेतील एका रिसर्च सेंटरमधील अभ्यासानुसार दररोज संस्कृतमध्ये बोलण्याने आपले मधुमेह व कॉलेस्टरॉल काठावर ठेवते. तसेच ते कमी देखील होते. याव्यतिरिक्त आपल्या ‘नर्व्ह सिस्टीम’मध्येही सुधारणा होते. जगातील 97 टक्के भाषा या संस्कृत भाषेवर अवलंबून आहे. यात काही इस्लामिक भाषांचा देखील समावेश आहे. नासाच्या संशोधनानुसार जर कॉम्प्युटरमधील प्रोग्राम हे संस्कृतमध्ये असतील तर त्यात चुका राहणार नाहीत’, असेही गणेश सिंह यांनी केला आहे.


























































