
बसपा खासदार दानिश अली यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून दावा केला आहे की, संसद भवनात माझे व्हर्बल लिंचिंग करण्यात आले. मात्र आता रस्त्यावरही माझे लिंचिंग होऊ शकते, माझी हत्या होऊ शकते. त्यामुळे भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याची चौकशी व्हायला हवी. अशी मागणीही दानिश अली यांनी केली आहे.