काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाला उद्ध्वस्त केले!

249

‘जम्मू-कश्मीरातून 370 कलम हटवण्याचे वचन काँग्रेसने 1964 साली संसदेत दिले होते पण हे वचन काँग्रेसने पाळले नाही. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाला उद्ध्वस्त केले’ असा हल्लाबोल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी हरयाणात सिरसा येथे पंतप्रधान मोदी यांची सभा झाली. ‘काँग्रेसने कश्मीर समस्येवर तोडगा काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला नाही. गेल्या 70 वर्षांत विविध समस्यांमध्ये कश्मीरातील जनतेला अडवून ठेवले. 70 वर्षांत कश्मीरातील अनेक निर्दोष लोकांचा मृत्यू झाला. हरयाणासह इतर राज्यांतील जवान तेथे शहीद झाले पण काँग्रेसने कश्मीर प्रश्न सोडवला नाही’ असे पंतप्रधानांनी सांगितले.

तात्पुरते म्हणजे 70 वर्षे असते का?

‘जम्मू-कश्मीरातून 370 कलम हटवून आमच्या सरकारने सकारात्मक पाऊल टाकले आहे, मात्र काँग्रेसवाले टीका करीत आहेत. संविधानात 370 कलमाचा उल्लेख ‘तात्पुरता’ असा केला होता. तात्पुरते म्हणजे किती वर्षे? दोन-चार वर्षे. मात्र 70 वर्षे झाली तरी 370 कलम हटवले नव्हते’ असे पंतप्रधानांनी सांगितले.

काँग्रेस सरकारने झोपा काढल्या!

‘दिल्लीतील झोपलेल्या काँग्रेस सरकारमुळे कश्मीरमधील परिस्थिती गंभीर होत गेली. सुरुवातीच्या काळात पाकिस्तानच्या मदतीने आपला काही भाग हिसकावला गेला आणि तो पाकव्याप्त कश्मीर बनला. कश्मीरमधील सूफी परंपरा संपुष्टात आणली गेली. सूफी विचार संपविले. जम्मू आणि लडाखला भेदभावाची वागणूक दिली. चार लाख कश्मिरी पंडितांना आपले राज्य सोडण्यास भाग पाडले’ असे घणाघात पंतप्रधानांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या