
दुधाला प्रतीलिटर दहा रुपये अनुदान द्या, अशी मागणी करीत शिवसंग्रामचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांच्यासह भाजप लोकप्रतिनिधींनी निदर्शने करीत नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन दिले.
शहरात कोरोनाचा कहर सुरू असल्याचे भान न बाळगल्याने या आंदोलनात सोशल डिस्टिंन्सगचा पुरता फज्जा उडाला. ‘कोरोनाला हरवू या’ असा फक्त नारा देणाऱ्या भाजपच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, खासदार भारती पवार यांच्यासह पदाधिकारी यावेळी हजर होते.

































































