
शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू असून नाशिकमधील नाशिकरोड भागातील भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड, त्यांचे पती भाजप पदाधिकारी हेमंत गायकवाड यांनी समर्थकांसह आज मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हातावर शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत उपस्थित होते.
नाशिक शहराच्या अन्य भागांतील प्रा. डॉ. लक्ष्मण शेंडगे, वैभवी घागरे, बबीता मोरे, सीमा ललवाणी, सुजाता गोजरे, सुजाता गवांदे, जयकुमार ललवाणी, किमया विवेक बागुल (राजपूत), रोहिणी उखाडे, अंकुश व्हावल, सत्यम खोले, हर्षल चव्हाणके आदी पदाधिकायांसह कार्यकर्त्यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी उपनेते दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, वसंत गीते, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गीते, भारती ताजनपुरे, अस्लम मणियार, संजय चव्हाण, महिला आघाडी जिल्हा संघटक स्वाती पाटील उपस्थित होते.
मूळ घरी आल्याचा आनंद!
आम्ही शिवसैनिकच आहोत. आज आमच्या मूळ घरी आल्याचा आनंद होत आहे. महाराष्ट्र आणि शिवसेना बळकट करण्यासाठी सतत कार्यरत राहू, असे या वेळी संगीता गायकवाड यांनी सांगितले.