भाजपची दुसरी यादी जाहीर; खडसे, तावडे, बावनकुळे यांचे नाव नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

#MahaElection 2019 आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये 14 उमेदवारंची घोषणा करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीतून नुकतेच भाजपमध्ये आलेल्या गोपिचंद पडळकर यांना बारामतीमधून उमेदवारी मिळाली आहे, तर राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये आलेल्या बीडच्या आमदार नमिता मुंदडा यांना केजमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांचा पीए नको, भूमीपुत्र द्या! अभिमन्यू पवारांच्या उमेदवारीवरून राडा

दुसऱ्या यादीमध्येही माजी मंत्री एकनाथ खडसे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याआधी भाजपने मंगळवारी आपली पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुक्ता टिळक, अतुल भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह 125 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली होती.

दुसऱ्या यादीतील उमेदवारांची नावे –

मोहन गोकुळ सुर्यवंशी (साक्री)
प्रतापदादा अरुणभाऊ अडसाद (धामणगाव रेल्वे)
रमेश मावस्कर (मेळघाट)
गोपाळदास अग्रवाल (गोंदिया)
अमरिशराजे आत्रम (अहेरी)
निलय नाईक (पुसद)
नामदेव ससाणे (उमरेड)
दिलीप बोरसे (बागलन)
कुमार उत्तमचंद ऐलानी (उल्हासनगर)
गोपीचंद पडळकर (बारामती)
संजय (बाळा) भेगडे (मावळ)
नमिता मुंदडा (केज)
शैलेश लाहोटी (लातूर (शहर)
अनिल कांबळे (उदगीर)