
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीचा परभाव ममता बॅनर्जीं यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यात जय श्रीराम म्हटल्यावर ममता बॅनर्जींचा चिडलेल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्या लोकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी बॅनर्जी यांनी दिली आहे. आता भाजपने ममता दीदींना जय श्री राम लिहिलेले 10 लाख पोस्ट कार्ड पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
बंगालचे नवनिर्वाचित खासदार अर्जुन सिंह म्हणाले की, “मुख्यामंत्र्यांच्या निवासस्थानी 10 लाख पोस्ट कार्ड पाठवण्याच निर्णय घेतला आहे. या कार्डवर जय श्रीराम लिहिलेले असेल.” अर्जुन सिंह हे पूर्वी तृणमूलचे आमदार होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये आले. तृणमूल काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू होती तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. तेव्हा भाजप कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज करण्यात आला होता.
ममता बॅनर्जींच्या समोर जय श्रीरामच्या घोषणा दिल्यास त्या चिडतात. त्यांची चिडण्याची ही दुसरी वेळे आहे. यापूर्वीही त्यांच्या उपस्थितीत जेव्हा काही लोकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.























































