सहकारी नेत्यासोबत खासगी फोटो व्हायरल झाल्याने भाजप महिला नेत्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसामध्ये भाजपच्या एका महिला नेत्याच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. पक्षातीलच एका नेत्यासोबत खासगी फोटो व्हायरल झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. शुक्रवारी रात्री आसामच्या गुवाहाटी येथील बामुनिमैदाम परिसरात ही घटना घडली आहे.

या नेत्याचं नाव इंद्राणी तहबिलदार असं आहे. तहबिलदार या चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्ष पदावर होत्या तसंच किसान मोर्चातही त्या सहभागी होत्या. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इंद्राणी यांचे अन्य एक भाजप नेत्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. हा नेता त्यांच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होता. इंद्राणी यांचे काही खासगी फोटो लीक होऊन व्हायरल झाले होते.

त्यानंतर इंद्राणी यांनी आत्महत्या केल्याने हे फोटो व्हायरल झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. गुवाहाटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप फोटो व्हायरल संदर्भातील कोणतीही तक्रार अद्याप दाखल झालेली नाही. तरीही या बाबीकडे लक्ष ठेवण्यात येणार आहे.