
देशात वाघाच्या दर्शनसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, मोहर्ली येथे काळ्या बिबट्याचेही वास्तव्य आहे. परंतु त्याचे दर्शन होणे दुरापास्त. काळे बिबटे दाट जंगलांमध्ये असतात आणि माणसांची थोडी जरी चाहूल लागली तरी गायब होतात. काळ्या रंगाचाही त्यांना फायदा होतो, त्यामुळे ते लगेच दिसतही नाहीत. मात्र छायाचित्रकार प्रेम कोल्हे यांना ताडोबातील जंगल सफारीदरम्यान काळ्या बिबट्याचे दर्शन झाले असून त्यांनी त्याला कॅमेऱ्यात कैद केले आहे.
View this post on Instagram