
सामना प्रतिनिधी । पुणे
नाशिक येथे शिक्षण उपसंचालक असलेले रामचंद्र जाधव यांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त पैसा जमविल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडे 46 लाख 82 हजार रूपयांचा काळा पैसा आढळला आहे. याप्रकरणी त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रामचंद्र नामदेव जाधव (57) हे पुण्यात शिक्षण विभागात तसेच पुणे महापालिकेच्या मंडळाचे प्रमुख होते. या काळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. लाच लुचतप प्रतिबंधक विभागाने 1985 ते 2012 या सेवाकाळातील त्यांच्या संपत्तीचे परीक्षण केले. त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतापेक्षा त्यांच्याकडे जास्त संपत्ती आढळली आहे. त्यांच्याकडे 46 लाख 82 हजार 403 रूपयांचा काळा पैसा सापडला आहे. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रेय भापकर यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 1988 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

























































