
सामना ऑनलाईन । अमृतसर
पंजाबच्या अमृतसरमधील राजासांसी गावात निरंकारी भवनात स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ग्रॅनेडहल्ला करून स्फोट घडवल्याची महिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
#UPDATE 3 dead & 10 injured in the blast at Nirankari Bhawan in Amritsar’s Rajasansi village: IG (Border) Surinder Pal Singh Parmar https://t.co/O99yKBjQFu
— ANI (@ANI) November 18, 2018
अमृतसरमधील राजासांसी गावात दोन संशयीत दुचाकीस्वारांनी येथील निरंकारी भवनात ग्रॅनेडहल्ला करून स्फोट घडवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. येथील नागरिकांनी दुचाकीस्वारांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते पसार झाले. दुचाकीस्वारांकडे पिस्तूल होते. तसेच त्यांनी आपला चेहरा झाकलेला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात रेड अलर्ट जाहीर केला आहे.





























































