
सामना ऑनलाईन । मुंबई
कांदिवली येथील पेट्रोल पंपावर रिक्षातील सीएनजी टँकमध्ये गॅस भरत असताना रिक्षाचा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. या तिघांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. अनिल शिवराम मोरे (57), सोहेल कमाल अहमद शेख (57), शैलेश कृपाशंकर तिवारी (25) हे जखमी झाले असून जखमींना तुंगा हॉस्पिटल, कांदिवली पश्चिम येथे उपचारासाठी नेले आहे.
कांदिवली येथील एस. व्ही. मार्गावरील मिलाप सिनेमागृहाजवळील पेट्रोलपंपावर हा अपघात झाला. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. टँकमध्ये प्रमाणापेक्षा जास्त गॅस भरल्याने हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
summary- blast at petrol pump of kandivali


























































