अल्लाला कुर्बानी देण्यासाठी आईने सहा वर्षाच्या मुलाचा गळा कापून केली हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधश्रद्धेपोटी आपल्या पोटच्या मुलांचा बळी देण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. अशीच एक घटना केरळच्या पलक्कड परिसरात घडली आहे. एका महिलेने आपल्या सहा वर्षाच्या चिमुरड्यासोबत असे काही केले की त्याने सगळ्यांनाच हादरा बसला आहे. पोलिसांनी या निर्दयी मातेला अटक केली आहे.

निर्दयी मातेने अल्लाला कुर्बानी देण्यासाठी आपल्या सहा वर्षाच्या निरागस मुलाची गळा कापून हत्या केली आहे. तिच्या या कृत्याने सगळ्यांनाच हादरा बसला आहे. केरळ येथील पलक्कड येथे ही घटना घडली आहे. आरोपी एक मदरसा शिक्षिका आहे. ही महिला गर्भवती आहे. तिने अंधश्रद्धेतून अल्लाला कुर्बानी देण्यासाठी आपल्या मुलाची गळा कापून हत्या केली आहे, तसेच हत्येनंतर तिनेच पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

या घटनेने सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसला आहे. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या आरोपी महिलेला तीन मुले आहेत. त्यात लहान मुलगा सहा वर्षांचा आहे. त्यादिवशी तो तिच्या बाजूला झोपला होता. झोपलेल्या मुलाला तिने जागे करुन बाथरुममध्ये नेले. तिथे आधी त्याचे पाय बांधले आणि नंतर त्याची गळा कापून हत्या केली. महिलेचा नवरा दुसऱ्या खोलीत दोन मुलांसोबत झोपला होता. अल्लाला खुश करण्यासाठी हे कृत्य केल्याचा दावा तिने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली आहे.