
ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका तरुणीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकारानंतर पीडित तरुणीने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट शेअर करत कंपनीकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. संबंधित तरुणीने या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत ‘देशात महिलांची सुरक्षा हा विनोद आहे का?’ असा थेट सवाल उपस्थित केला आहे. तिच्या पोस्टनंतर ब्लिंकिटने दिलगिरी व्यक्त करत संबंधित डिलिव्हरी बॉयवर कारवाई केली जाईल, असे म्हटले