आंगणेवाडी येथील शिबिरात ३३ दात्यांचे रक्तदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

आंगणेवाडी येथील देवी भराडी मंदिर कलशारोहणच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आंगणे कुटुंबीय व आंगणेवाडी नाट्य मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उदघाटन शुक्रवारी सकाळी करण्यात आले. यावेळी गजानन उर्फ बाबू आंगणे, डॉ दिगंबर आंगणे, दत्तात्रय आंगणे, भिकाजी आंगणे, देवेंद्र आंगणे, तुषार आंगणे, पंकज आंगणे, कृष्णा आंगणे, दिनेश आंगणे यांच्यासह मंदार केणी, संतोष पालव व अन्य आंगणे ग्रामस्थ उपस्थित होते. या रक्तदान शिबिरास जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी विभागाचे डॉ सुशील परब, हेमांगी रणदिवे, किशोर नांदगावकर, उल्हास राणे, नंदकुमार आडकर व नितीन गावकर यांचे सहकार्य लाभले.