मुंबईच्या विकासाला अधिक गती देणार, 30692.59 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई महानगरपालिकेचा 2019-20 करिताचा अर्थसंकल्प महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी सादर केला. या वर्षीच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी 30692.59 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतूदीचा फायदा मुंबईला उत्तम पायाभूत सुविधा तसेच सेवा सुविधा प्रदान करण्यासाठी होईल, असे अजॉय मेहता यांनी यावेळी म्हटले आहे.

रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीसाठी 2019-20 या वर्षामध्ये ₹206.25 कोटी रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्ताविण्यात आली असून यामुळे मुख्य आणि उपनगरीय रुग्णालये, प्रसुतिगृहे आणि आरोग्यकेंद्रे यांना फायद्या मिळणार आहे.

माहिती तंत्रज्ञान विभागाकरिता 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये भांडवली खर्चाकरिता 173.23 कोटी आणि  महसूली खर्चाकरिता 202.44 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. यामुळे महापालिकेचे कामकाज जास्त कार्यक्षमपणे व पारदर्शकपणे होण्यास मदत होणार आहे.