पालिकेच्या सहआयुक्त, उपायुक्तांच्या बदल्या

मुंबई महानगरपालिकेच्या एक सहआयुक्त आणि दोघा उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सहआयुक्त भारत मराठे, उपायुक्त विजय बालमवार आणि उपायुक्त देविदास क्षीरसागर अशी या अधिकाऱ्य़ांची नावे आहेत. पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने आज रात्री याबाबत परिपत्रक जारी केले.

सहआयुक्त असणारे भारत मराठे हे परिमंडळ-5 आणि संपर्क अधिकारी (मागासवर्ग कक्ष)चे सहआयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे आता परिमंडळ -4 तसेच संपर्क अधिकारी (मागासवर्ग कक्ष) यांचे सहआयुक्त पद देण्यात आले असून परिमंडळ-5 च्या सहआयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. परिमंडळ-4 आणि परिमंडळ-5च्या उपायुक्त पदी कार्यरत असलेले विजय बालमवार यांच्याकडे आता परिमंडळ-2च्या उपायुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य या पदाचे पूर्णकालिक कार्यभार असलेले देविदास क्षीरसागर यांच्याकडे आता परिमंडळ-6च्या उपायुक्त पदाचा पूर्णवेळ कार्यभार तसेच सार्वजनिक आरोग्याच्या उपायुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या