
मुंबईत आता 2000 चौरस मीटरपेक्षा मोठय़ा भूखंडावर बांधण्यात येणाऱया इमारतींना टेरेस गार्डन, व्हर्टिकल गार्डन बनवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबतच्या धोरणाला तत्त्वतः मान्यताही देण्यात आली आहे. मुंबईतील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी नव्या उपाययोजना शोधण्याच्या सूचना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या होत्या. यानुसार पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे.
मुंबईसारख्या शहरात मोठय़ा इमारतींच्या टेरेसकर मोकळी क हिरकळ निर्माण करण्यायोग्य जागा मोठय़ा प्रमाणात दिसून येते. अशा जागांचा कापर हिरकळ निर्माण करण्याकरिता केला तर तापमानकाढीसारख्या समस्या काही अंशी कमी होतील. या उद्देशाने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार टेरेस-व्हर्टिकल गार्डन उपक्रमाचे धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
बांधकाम क्षेत्रात पत्र्यांऐवजी बायोवॉल
z या धोरणानुसार बांधकाम सुरू असणारी ठिकाणे पत्र्यांनी बंधिस्त करण्याऐवजी हिरवळयुक्त व्हर्टिकल बायोवॉल तयार करणे बंधनकारक करण्यात आहे.
z यासाठी सविस्तर धोरण तयार करण्यात आले असून पालिकेच्या किकास नियोजन खात्यास धोरणाची तपासणी करून अभिप्राय देण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
z हे धोरण महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री क नॅशनल रिअल इस्टेट डेक्हलपमेंट कौन्सिल अशा बांधकाम क्षेत्रातील संस्थांसोबत चर्चा करून अंमलबजाकणीबाबत पालिका निर्णय घेणार आहे.
अशी आहेत आव्हाने
z विकासकास बांधकामाची सुरक्षा आणि संरचनात्मक स्थिरतेची खात्री करावी लागणार.
z इमारतीच्या परिरक्षणाकरिता पुरेशी जागा उपलब्ध ठेवावी लागणार.
z पाणी गळतीची समस्या तयार होणार नाही अशा पद्धतीने काम.
z हिरवळीच्या विटवण्याकरिता सिंचन व्यवस्थेची सोय.


























































