तिसऱया लाटेसाठी पालिका सतर्क ; पाच जम्बो कोविड सेंटरमध्ये 748 आयसीयू, 4099 ऑक्सिजन बेड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत सध्या कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी सध्या दररोज 400 ते 500 कोरोना रुग्ण आढळत आहेत. असे असताना तिसरी लाट प्रत्यक्षात आली नसल्याचे पालिका म्हणत असली तरी कोरोना रोखण्यासाठी प्रशासनासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. तिसऱया लाटेच्या तयारीसाठी पालिकेने बीकेसी, दहिसर, सोमय्या, कांजूर मार्ग आणि मालाड या जम्बो कोविड सेंटरच्या ठिकाणी आणखी 748 आयसीयू आणि तब्बल 4099 ऑक्सिजन बेड उपलब्ध ठेवले आहेत.

सध्या दहिसर, नेस्को गोरेगाव, बीकेसी, एनएससीआय वरळी, मुलुंड, रिचर्डसन ऍण्ड क्रुडास भायखळा ही जम्बो कोविड सेंटर ‘ऑक्टिव्ह’ ठेवली आहेत. येथील उपलब्ध 16 हजार बेडवर 1700 म्हणजेच 11 टक्के पेशंट आहेत. याशिवाय मालाड, कांजूर मार्ग या ठिकाणची जम्बो कोविड सेंटर पालिकेच्या ताब्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

अशी आहे बेडची उपलब्धता

बीकेसीः आयसीयू – 108, दहिसरः आयसीयू – 100, ऑक्सिजन – 613, नॉन ऑक्सिजन – 117, सोमय्याः आयसीयू – 200, ऑक्सिजन – 750, पेडियाट्रिक आयसीयू – 50, पेडियाट्रिक – 100, मालाडः आयसीयू – 190, ऑक्सिजन – 1536, नॉन ऑक्सिजन – 384, डायलिसीस – 20,  कांजूर मार्गः आयसीयू – 150, ऑक्सिजन – 1200, नॉन ऑक्सिजन – 300, पेडियाट्रिक आयसीयू – 50.