वर्सोवा-लोखंडवाला जोडणारा पूल उभारणार; वाहनांचा वेळ वाचणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा आणि लोखंडवाला या परिसरांना जोडणारा एक वाहतूक पूल पालिका बांधणार आहे. कवठे खाडीवर हा पूल बांधण्यात येणार असल्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचा वेळ वाचणार आहे. या कामासाठी पालिका ४४ कोटी खर्च करणार आहे. येत्या स्थायी समितीसमोर याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. अंधेरी पश्चिमेकडील कवठे खाडीवर पश्चिम बाजूला पालिकेने दोन्ही बाजूला १८.३० मीटर लांबीचा विकास नियोजन रस्ता आधीच बांधला आहे, मात्र मध्येच खाडीमुळे हा रस्ता पूर्ण विकसित होऊ शकत नाही. त्यामुळे या खाडीवर वाहतूक पूल बांधण्याचे पालिकेने ठरवले आहे. हा पूल बांधल्यास वाहनांचा खूप वेळ वाचणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या पुलासाठी प्रशासनाने मे. साई प्रोजेक्टस् या कंत्राटदाराची निवड केली आहे. या कामासाठी पालिका ४४.३८ कोटी खर्च करणार आहे.