
महिला बचत गटांना पालिका आता दोन हजारांपासून 25 हजारांपर्यंत मदत करणार आहे. यासाठी पालिकेने जेंडर बजेटमधील चार कोटी रकमेपैकी 2 कोटी 83 लाख 75 हजार रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे बचत गटांच्या सक्षमीकरणाला गती मिळणार.
पालिकेच्या सन 2019-20 या अर्थसंकल्पातील जेंडर बजेटअंतर्गत महिला बचत गटांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी काम करण्यात येणार आहे. मात्र महिला क बाल कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बचत गटांना या योजनेच्या निकषास पात्र ठराके लागणार आहे. या योजनेअंतर्गत केशरी/ पिकळे शिधापत्रिकाधारक कुटुंबांचे कार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत असलेल्या कुटुंबातील 18 कर्षांकरील महिलांना बचत गटांत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्टय़ा सबलीकरण करता येण्याच्या उद्देशाने 10-20 महिलांचा एक बचत गट स्थापन करण्यात येईल. सदर बचत गटाने त्यांचे खाते राष्ट्रीयीकृत/ सारस्कत बँकेत उघड्ल्यानंतर तीन महिन्यांनी त्या बचत गटाला किमान दोन ते 25 हजार रुपये खेळते भांडकल देण्यात येणार आहे.
1135 बचतगटांना होणार फायदा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कीस निकष तयार करण्यात आले आहे. त्यानुसार जेंडर बजेटअंतर्गत 2 कोटी 83 लाख 75 हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ 1135 महिला बचत गटांना होणार आहे. एखाद्या बचत गटाने गैरक्यकहार केल्यास त्यांच्याकडील खेळते भांडकल काढून घेण्यात येणार असून सदर बचत गटाला कायमस्करूपी बंदी घालण्यात येणार आहे. महिला बचत गटाच्या प्रत्येक सदस्याकडे आधार कार्ड/ पाकती असणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.




























































