
मुंबई महानगरपालिका सतत आपल्याकडे होती आणि यापुढेही आपल्याकडेच राहणार, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले म्हणाले आहेत. मुंबई-महाराष्ट्राचा लोकप्रिय सण असलेला गणेशोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. असे असतानाही पालिका आणि सरकारने मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या अनेक समस्या अद्याप सोडवलेल्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडणार पडली. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.
यावेळी मुंबईतील गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी बैठकीत उपस्थित लोकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “लोकमान्य टिळक यांनी सुरु केलेली परंपरा तुम्ही (गणपती मंडळांनी) नुसती कायम ठेवली नाही तर, जल्लोषात कायम ठेवली. किमान शंभर वर्ष होऊन गेली, मात्र कुठे ही उत्साहाला ओहोटी लागली, असं दिसलं नाही. या सर्व काळात अनेक संकटे आली. त्यातली काही नैसर्गिक होती, काही सरकारी पण आहे. विशेषतः कोरोनाचा काळ खूप भयानक होता. कोरोना जर नसता तर, मी मुख्यमंत्री होतो. तुमचे प्रश्न मी त्याचवेळी सोडून टाकले असते.”
उद्धव ठाकरे म्हणाले की, “मला नेहमी वाटतं की, लोकमान्य यांनी आपल्या सणांची चळवळ केली. त्या चळवळीतून स्वातंत्र मिळवण्यासाठी जी एकजूट हवी होती, ती झाली. स्वातंत्र्यानंतर चळवळीचे उत्सवात रूपांतर झालं. गर्दी तर आजही होते, मात्र नुसत्या गर्दीला अर्थ नाही, त्या गर्दीमध्ये एक बांधीवपणा पाहिजे, एकजूट हवी. 2010 साली मला आठवत आहे की, डेंग्यू आणि मलेरियाचा थायमन होता. आपण येथेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. त्यावेळी काय करायला हवं, काय नको, याचं प्रात्यक्षिक दाखवलं. ते दाखवताना मी येथेच पहिल्या रांगेत बसलो होतो. माझ्या बाजूला महानगरपालिकेचे अधिकारी होते. ते मला म्हणाले, उद्धवजी येथेच खाली लॉबीमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. म्हटलं आता बोंबला, आता घरी जयेपर्यंत हुडहुडी भरतेय की का? याची वाट बघत होतो. मात्र सुदैवाने तसं झालं नाही. एकूण काय, आपण सामाजिक बांधिलकी विसरलो नाही. जल्लोष पाहिजेच, नाहीतर मग जिवंतपणा बघायचा कसा? जल्लोष, उत्सव पाहिजेच. उत्सव म्हटल्यानंतर उत्साह आलाच. पण त्या उत्सवातही आपण आपली परंपरा जपली आणि जपत आलो.”
ते म्हणले, “आता विनोद घोसाळकर तुम्ही म्हणालात की, मंडळांची पळवापळवी सुरु आहे. कोण पळवत आहे मंडळ? कुठे घेऊन जाल पळून? शेवटी मुंबईतच राहणार ना. मंडळात बसलेल्या गणपती बाप्पांचे आशीर्वाद जोपर्यंत आम्हाला आहे, तुम्ही कितीही गणपती मंडळे पळवा, आम्हाला काय कोणाची पर्वा नाही. पळवापळवी व्यतिरिक्त हे दुसरं करूच काय शकतात. पण मला नाही वाटत की, अशी पळवापळवी निदान गणपतीचे भक्त आणि गणपती मंडळं करत असतील, जे आपली परंपरा कायम ठेवत आहे. जे अशा आमिषांना बळी पडत आहे. ते पडू नये, अशी माजी अपेक्षा आहे. पाच- वर्षानंतर भेटीनंतर मला असं वाटलं की, आता सगळ्या अडचणी सुटल्या आहेत, मग ही बैठक घ्यायची कशाला? बोलायचं तरी काय? कारण अडचणीच नाहीये. कारण दरवेळेला आपण भेटल्यावर एकतर मी तुम्हाला काहीतरी सांगत होतो आणि तुम्ही तुमच्या अडचणी मला सांगत होता. साहजिकच आहे, सत्ता काहीच काळासाठी होती. मात्र महानगरपालिका सतत आपल्याकडे होती आणि यापुढेही आपल्याकडेच राहणार. आता तर आपल्याकडे काहीच नाही. मग बैठक कशासाठी घ्यायची? बैठकीला येणार कोण? मात्र मला तुमचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की, सत्ता जरी नसली तरी, रस्त्यावरची ताकद आपल्याकडे आहे आणि तुमच्या माध्यमातून आज सुद्धा ती कायम आहे. याचा मला अभिमान आहे.”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “एक-दोन गोष्टी मी ऐकल्या की, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे बंधन यावर्षापर्यंत होतं, पुढच्या वर्षी त्याचं काय होणार? मला एक कळत नाही की, मध्ये आपण हिंदी सक्ती नको, म्हणून आंदोलन केलं. त्यानंतर तो जीआर त्यांनी मागे घेतला आणि ज्यांची कमिटी नेमली ते नरेंद्र जाधव हे अर्थतज्ज्ञ आहेत. म्हणजे यांचा भाषेशी तसा काही संबंध नाही. आता सुद्धा पर्यावरण विषयासाठी पीओपीबद्दलची समिती नेमली. आम्ही सुद्धा पर्यावरणप्रेमी आहोत. पण पर्यावरणाचं प्रेम कोणाकडून शिक्षकायचं? ज्यांनी अणुऊर्जेचं समर्थन केलं, त्या अनिल काकोडकरांकडून? म्हणजे तिथे पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणात रास होणार आहे. समुद्राचं तापमान वाढेल आणि इतर गोष्टींमुळे आपण त्याला नाही सांगितलं. मात्र त्यांना तुम्ही येथे पर्यावरणतज्ज्ञ म्हणून नेमत आहे आणि त्यांनी जे दंडक घालून दिले आहेत ते आम्ही मानायचे, कोणता कारभार आहे हा?” सूचना कोणाच्या ऐकायच्या? कोण आहे हे सरकार, ज्यांनी आरेचं जंगल कापलं, ते आहे हे सरकार. परिवारणप्रेमी जे तिथे जंगल वाचवण्यासाठी बसले होते, त्यांना तुरुंगात टाकलं, त्यांच्यावर केसेस टाकल्या. आरेची जागा मेट्रोला देऊ नये, त्याला पर्याय आपण देत होतो. तेव्हा आपल्याला ती जागा दिली नाही. आता बरोबर आपलं सरकार पडल्यानंतर कांजुरची जागा त्यांनी घेतली आणि ती कोणाच्या घशात घातली, हे सगळ्यांना माहित आहे. हे पर्यावरणप्रेमी कमी की, मित्रप्रेमी आहे. मी यात राजकारण नाही आणत. मात्र ज्या घटना झाल्या आहेत, त्या जर का बघितल्या तर, यामध्ये राजकारण आहे की नाही? हे तुम्ही ठरवायचं आहे.”
उद्धव ठाकरे म्हणाले की, “प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय काय? शाडूची माती, कोण देतंय कुटून आणणार? मूर्ती किती उंचीची पाहिजे? दरवर्षी तुम्ही (गणेश मंडळं) माझ्या दारात (सरकारच्या) आलंच पाहिजेत आणि मग मी (सरकार) तुमच्यावरती उपकार केलेत, असं समजून चला यावर्षी तुम्हाला मी देतो. पण पुढच्या वर्षी बघू. मग पुढच्या वर्षी परत जायचं, मग या वर्षी झालं, पुन्हा पुढच्या वर्षी पुन्हा बघू. हा लाचारपणा आम्हाला नको. जर रद्द करायचं आहे, तर ते आताच पूर्ण रद्द करा. पर्यावरणप्रेम आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही. आम्ही सुद्धा पर्यावरण प्रेमी आहोत. मुंबईसाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, तो मोठा गहन आहे. आपण त्यावर पर्याय काढला होता. गारगाई आणि पिंजाळात लाखो झाडे कापले जाणार आहे, हा काय पर्यावरणाचा प्रश्न नाहीये? म्हणून तो जो पर्याय होता, तो नंतर घेऊ. आधी मी असं ठरलं होतं की, समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करून आपल्या मुंबईकरांची तहान भागवायची. पाऊस पडेल न पडेल. पडला तर आनंद आहे, नाही पडला तर काय करायचं? एवढे हजारो कोटी रुपये त्यात घालावयाचे आणि पाऊस नाही पडला तर, पाणी येणार कुठून? म्हणून असं सांगितलं होतं की, समुद्राचे पाणी गोड करून प्यायला वापरू जे जगभरात इतरत्र वापरतात. आपण ही करू. म्हणजे पिण्याचा पाण्याचा कधी तुटवडाच पडणार नाही. कालच्या अधिवेशनात यांनी गारगाई पिंजाळ मंजूर केलं आणि नंतर आम्ही समुद्राचं पाणी गोड करण्याचा विचार करू, असं सांगितलं. मात्र विचार करायला मुळात डोकं लागतं, तेच जर नसेल तर विचार करणार कसा? म्हणजे पर्यावरणाची हानी स्वतः काय करतायत स्वतःसाठी, मग झाडं कापा. तिकडे अणुऊर्जेचा प्रकल्प आणत होते, तो आणू दिला नाही. आणू देणार नाही, तो भाग वेगळा. पण त्यांचं बरोबर पर्यावरणतज्ज्ञ म्हणून इकडे देणार आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरती बंदी घालणार, हे पर्यावरणतज्ज्ञ किंवा पर्यावरण प्रेम समजून घ्यायचं कसं.”
ते म्हणाले की, “आता हा सण आहे, या सणामध्ये मग मी (महायुती सरकारने) काहीतरी केलं पाहिजे. कारण मला उद्या निडवणूक लढाव्याची आहे. मग काय करतो मी (महायुती सरकार), मोफत एसटी. कारण का सगळा माझा चाकरमानी आहे. कोकणी बांधव आहेत, माताभगिनी आहेत. ते इकडे सगळे झाल्यानंतर कोकणामध्ये जाणार. मग एसट्या जास्त सोडा, त्या सोडल्याच पाहिजेत. पण फुकट एसट्या करायच्या, फुकट एसट्या ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण जाता जाता जे काय खड्डे खाज खळगे आहेत, म्हणजे फुकट मोफत प्रवास. प्रवास तुमची हाड खिळखिळी करून देण्याची मी मोफत सोय करून देतोय जा. मागे एकदा गडकरी बोलले होते की असा रस्ता होईल की 200 वर्ष खड्डे पडणार नाहीत. पण पुढची लाईन अशी होती की, 500 वर्ष रास्तच होणार नाही. 500 लागतील रस्ता व्हायला. त्यानंतर 200 वर्ष रस्त्यावर खड्डा पडणार नाही. पण तोपर्यंत राहणार कोण आहे. मुंबई-गोवा रस्ता होतोय, यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे हाडे अपघात होतात. त्यामुळे हाडे खिळखिळी होतात. पण इकडे जर का मंडपासाठी रस्त्यावरती खड्डा खणला तर, 15000 रुपये दंड. आज मी जाहीर करत अशी की, मुंबई ते गोवा किंवा मुंबई ते कोकण जेवढे खड्डे आहे, त्या खड्ड्यांवर सरकारला दंड लावा.”