आयुर्वेदिक पद्धतीने शरीर शुद्धीकरण आहार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हा एक असा आहार की जो आपल्या शरीरात जमा झालेली विषारी द्रव्ये बाहेर काढून, शरीराला शुद्ध करतो. या आहाराच्या सेवनाने पचनसंस्थेला आराम तर मिळतोच शिवाय विजातीय द्रव्यांचे पचन करून त्यांना शरीराबाहेर काढण्यास मदत होते.

शुद्धीकरण आहार प्रामुख्याने दोन प्रकारचा असतो. पहिला आहार साधारणत: सर्वांसाठी लाभदायी आहे. प्रत्येक व्यक्ती तो घेऊ शकते. दुसऱया प्रकारचा आहार हा शरीरातील विजातीय द्रव्यासह ते शरीराच्या कोणत्या भागात जमा झाले आहे आणि त्याची तीव्रता या आधारे ठरविला जातो.

आपले वेगवेगळ्या प्रकारचे भोजनसुद्धा शरीरात हे विषद्रव्य निर्माण करत असतात. आपण नेहमीच स्वास्थ्यवर्धक आहार घेऊ शकत नाही. आपली दिनचर्या शरीराच्या जैविक घडय़ाळानुसार नीट सुरू असेल तर ही विजातीय द्रव्ये आपोआप शरीराबाहेर टाकली जातात. भरपूर प्रमाणात पाणी पित असलो आणि योग, व्यायाम नियमितपणे करीत राहिलो तर शरीरातून घाम व मलनिस्सारण योग्यपणे होते.

जुनाट रोगाच्या लोकांना केवळ एकदा हा आहार घेऊन फायदा होत नाही. त्यांच्यासाठी तज्ञ डॉक्टर विशिष्ट आहार ठरवतात. विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी एक उपचार पद्धती आहे ज्याला ‘पंचकर्म’ असे म्हणतात. यात आहारापेक्षा जमा झालेला मल बाहेर काढण्याला महत्त्व दिले जाते. मधुमेही रुग्णांना आवश्यक आहे की त्यांनी या आहार पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्यावा व त्यांनी सांगितलेल्या आहार प्रणालीचे पालन करावे.

या आहारात पहिले तीन दिवस फळे, फळांचा रस, भाज्या आणि भाज्यांचा रसांचे सेवन करावे. हे सारे कच्चेच असते. (शिजवण्याची गरज नाही) हे पचायला हलके असते तसेच विजातीय द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करते. तीन दिवसांनंतर फळं, भाज्या आणि त्यांच्या रसासोबतच हळूहळू शिजविलेले अन्नही घ्यायला सुरुवात करावी. यात सूप, मुगाच्या डाळीचे वरण व सूप याच्या सेवनाने सुरुवात करावी. त्यासोबत खिचडीचाही अंतर्भाव करावा. हे दहा दिवसांचे संतुलित आहाराचे वेळापत्रक आहे जे कोणीही उपयोगात आणू शकतात.

मधुमेही रुग्णांनी फळांच्या ऐवजी भाज्या व भाज्यांचा रस आहारात घ्यावा तसेच आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने काही पाचक अन्नपदार्थ घेऊ शकतात. तुमच्या शरीराची गरज तुम्हीच योग्य प्रकारे जाणता, म्हणून जर प्रत्येक तीन तासांनी काही खायची गरज वाटली तर त्याप्रमाणे आपल्या आहारात तसा बदल करू शकता.असे आहाराचे वेळापत्रक दर तीन महिन्यांनी दहा दिवसांसाठी पाळावे. अर्थात वर्षातून चारदा प्रत्येक ऋतू बदलताना घेऊ शकतो. ऋतू बदलताना आपल्या शरीरातही काही बदल होत असतात. आपल्या आहारातही काही बदल होतो. अशा वेळी शरीरात विषद्रव्यांचे प्रमाण वाढू शकते. आयुर्वेदिक उपचार पद्धतीत नाडी परीक्षा या आगळ्यावेगळ्या रोगनिदान प्रकानिरोगी आयुष्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत – योग्य आहार, स्वस्थ जीवनशैली आणि मनाची अवस्था.

आहार
– बदलत्या ऋतूनुसार स्थानिक पिकणाऱया अन्नाचा आहारात अधिक वापर करावा. ताजे आणि रसायनमुक्त अन्न पचण्यास हलके आणि आरोग्यासाठी उत्तम असते.
– दिवसाची वेळ कामासाठी आणि रात्रीची वेळ विश्रांतीसाठी असते.
– स्वस्थ जीवनशैलीत व्यक्तीच्या मानसिक स्थितीला खूप महत्त्व आहे.
– योग व ध्यान मनाला कुशलतेने कसे सावरून घ्यायचे हे शिकविते.