बोगस डॉक्टर अल्ताफ पोलिसांच्या ताब्यात; गोवंडीत सुरू होता रुग्णांच्या आयुष्याशी खेळ

गोवंडी परिसरात एक बोगस डॉक्टर दवाखाना चालवत असल्याची खबर पोलिसांनी मिळताच त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

अल्ताफ हुसेन खान नावाच्या 50 वर्षीय व्यक्तीला गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात तोतयागिरी करून क्लिनिक चालवल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. एक बनावट डॉक्टर पदवी किंवा परवान्याशिवाय क्लिनिक चालवत असल्याची माहिती मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी बोगस डॉक्टरला पकडण्यासाठी एका पोलीस हवालदाराला पेशंट म्हणून माहिती घेण्यासाठी पाठवलं. मिळालेल्या माहितीची पुष्टी झाल्यानंतर क्लिनिकवर छापा टाकून डॉक्टरला अटक करण्यात आली. आयपीसीच्या कलम 419, 420 अन्वये आणि महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्ट, 1961 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.