मध्यान्ह भोजनावेळी बॉयलरचा स्फोट; चार ठार तर पाच जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शालेय विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनावेळी बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना बिहार येथे घडली आहे. या घटनेत चार जण मृत्युमुखी पडले असून पाच जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बिहार येथील पूर्व चंपारण भागातील सुगौली परिक्षेत्रात ही भयंकर घटना घडली. शनिवारी इथे मध्यान्ह भोजनाची तयारी सुरू होती. त्यावेळी बॉयलरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की, मृतांच्या देहाच्या चिंधड्या उडाल्या आणि त्या भोजन केंद्राच्या बाहेरून जाणाऱ्या रस्त्यावर येऊन पडल्या. त्यामुळे मृतांची संख्या चार असली तरी ती वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या घटनेत पाचहून अधिक जण जखमीही झाले आहेत.

स्फोट झाल्यानंतर त्वरित बचाव कार्य केलं गेलं. जखमींना स्थानिक रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे. शाळांना मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या या संस्थेचं नाव नवप्रयास असं असून यात जवळपास 12 कामगार काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.