आता या बॉलिवूड अभिनेत्याला कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेला काही काळ कोरोना संक्रमणाचा विळखा अवघ्या देशावर पडला आहे. कोरोनाच्या संक्रमणातून सामान्यांपासून व्हीआयपींपर्यंत कुणीच सुटलेलं नाही. बॉलिवूडमधील अनेक कलाकार कोरोना संक्रमित झाले असून त्यात अजून एका कलाकाराची भर पडली आहे.

या अभिनेत्याचं नाव अर्जुन कपूर असं आहे. अर्जुन कपूर याने स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कोरोना संक्रमित झाल्याची माहिती दिली आहे. अर्जुनला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसून तो वैद्यकीय सल्ल्यानुसार स्वतःला घरातच क्वारंटाईन करणार आहे. सध्याचे दिवस कठीण असून आपल्या सर्वांचं प्रेम आणि सदिच्छांसाठी त्याने आभारही मानले आहेत. हा काळ कठीण असला तरी संपूर्ण जग या विषाणूच्या हल्ल्यातून बाहेर पडेल, असा विश्वासही त्याने पोस्टमधून व्यक्त केला आहे.

arjun1

अर्जुन कपूरपूर्वी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन, दिग्दर्शक राजामौली इत्यादींना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही कलाकारांचे कुटुंबीय आणि काही कलाकारांसोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.


View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on