बॉलिवूड अभिनेत्याची प्रकृती बिघडली, कुटुंबाने केले आर्थिक मदतीचे आवाहन

मेहेंदी, फरेब अशा चित्रपटांमध्ये मुख्य भुमिका केलेला अभिनेता फराज खान याची प्रकृती बिघडली असून त्याच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फराजवरील उपचारांसाठी तब्बल 25 लाखांचा खर्च असून त्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी मदत करण्याचे आवाहन केले आहे. फराजची कोस्टार राहिलेली अभिनेत्री पूजा भट्ट हिने देखील सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना फराजला मदत करण्याचे आवाहन केले आहे. फराजला ब्रेन इन्फेक्शन व न्यूमोनिया झाला आहे.

पूजा भट्ट ने शेअर केलेल्या पोस्टमध्ये फराजचे पूर्वीचे व आताचे फोटो शेअर केले आहेत. ‘प्लीज जितके शक्य तितकी ही पोस्ट शेअर करा व कॉन्ट्रिब्युट करा. मी पण करतेय. तुमच्यापैकी कुणी मदत केली तर मी त्यांचे आभारी असेन.’ अशी पोस्ट टाकत पूजाने फंड रेजिंगची लिंक शेअर केली आहे. हा फंड रेजर फराजच्या कुटुंबाने सुरू केला आहे. त्यात त्यांनी फराजला कफाचा त्रास असून त्याच्या छातीत इन्फेक्शन झाले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर हैदरबादमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावरील उपचारासाठी 25 लाखांचा खर्च येणार आहे असे सांगितले आहे. या फंड रेजरमधून आतापर्यंत 1 लाख रुपये जमा झालेआहेत.

आपली प्रतिक्रिया द्या