
दिग्गज अभिनेते सतिश कौशिक यांच्या निधनानंतर बॉलीवूडसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. अभिनेता सलमान खानसोबत जय हो सिनेमात महत्वाची भूमिका साकारणारा अभिनेता समीर खाकर यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी खासगी रुग्णालयात त्यांवी अखेरचा श्वास घेतला घेतला आहे. ते 71 वर्षांचे होते.
समीर खाकर यांचा लहान भाऊ गणेश खाकर यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. गणेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर यांना मंगळवारी श्वास घ्यायला त्रास होत होता, नंतर ते बेशुद्ध झाल्याने घरी डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल करायला सांगितले. त्यांना बोरीवलीच्या एमएम रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले होते. त्यांचे सर्व अवयव निकामी झाले आणि शरीराने प्रतिसाद देणे बंद केले आणि ते बेशुद्ध पडले. आज पहाटे 4.30वाजता त्यांचे निधन झाले. समीर यांच्या पश्चात त्यांची पत्नी आहे. मुंबईतील बोरीवली येथील ,स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
समीर खाकर हे ‘नुक्कड’ या मालिकेतील खोपडी नावाच्या व्यक्तिरेखेसाठी प्रसिद्ध होते. त्यानंतर शाहरुख खान स्टारर ‘सर्कस’मध्येही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘श्रीमान श्रीमती’ या मालिकेतील समीर यांची टोटोची भूमिका खूप गाजली आहे. ‘पुष्पक’, ‘गुरु’, ‘राजा बाबू’ आणि ‘हसी तो फसी’ या सिनेमांमध्ये ते दिसले होते. सलमान खान याच्यासोबत ‘जय हो’ सिनेमात त्यांनी एका दारूड्याची भूमिका साकारली होती.
























































