‘या’ बॉलीवूड स्टार्सवर लागलाय एवढा पैसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन वर्ष सुरू झाले असून प्रत्येकासाठी ते नक्कीच खास असणार आहे. पण तरीही बॉलीवूड स्टार्ससाठी मात्र हे वर्ष विशेष असणार आहे. कारण यावर्षी अनेक ‘बिग बजेट’ चित्रपट प्रदर्शित होत असून त्यावर या स्टार्सचे भविष्य ठरणार आहे. यातील बहुतेक स्टार्स एकाहून अधिक चित्रपटात झळकणार आहेत. यामुळे साहजिकच निर्मात्यांना त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत.

akshay

या बिग बजेट चित्रपटांच्या यादीत सध्या फार्मात असलेल्या अक्षय कुमारचे नावही आहे. त्याच्याकडे चार चित्रपट असून सूर्य़वंशी, पृथ्वीराज, लक्ष्मी बॉम्ब आणि बच्चन पांडे या चित्रपटात अक्षय झळकणार आहे. दिवाळी, ईद, ख्रिसमसच्या मुहूर्तावर हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांवर निर्माते तब्बल  375 कोटी रुपये खर्च करणार आहेत. यामुळे अक्षयसाठी हे वर्ष उत्साहाबरोबरच आव्हानात्मक असणार आहे.

aamir-khan-2

तसेच  मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ तिकीट बारीवर सपशेल आपटल्यामुळे तो जरा टेन्शन मध्ये आहे. यामुळे यावर्षी आमिर नव्या दमाने मोठया पडदयावर येण्याच्या तयारीत आहे. यावर्षी त्याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट येणार आहे. 100 कोटींचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करेल याची चिंता आतापासूनच आमिरला भेडसावतेय.

tanaji

अजय देवगनचा अजय, तानाजी: द अनसंग वारियर, मैदान और भुज: द प्राइड ऑफ इंडिया, योद्धा हे चित्रपट 2020 मध्ये येणार आहेत. त्यावर निर्मात्यांनी 325 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामुळे अजयसाठी हे वर्ष विशेष असणार आहे.

kartik-aryanतर चॉकलेट हिरो असलेल्या कार्तिक आर्यनसाठी 2019 हे वर्ष खूपच चांगले होते. त्याचे चित्रपटही बऱ्यापैकी गाजले. यामुळे यावर्षी त्याच्याकडून निर्मात्यांबरोबरच त्याच्या चाहत्यांनाही खूप आशा आहेत. भूल भुलैया 2, दोस्ताना 2 आणि लव आजकल या चित्रपटात तो दिसणार आहे. या चित्रपटांसाठी निर्मात्यांनी 150 कोटी लावले आहेत.

kiara

तर वेगवेगळ्या भूमिकेमुळे अल्पावधीतच लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन बनलेली ‘कियारा आडवाणी’ यावर्षी दोनपेक्षा अधिक चित्रपटात झळकणार आहे. भूल भुलैया 2, लक्ष्मी बॉम्ब, शेरशाह आणि इंदू की जवानी या चित्रपटात ती काम करत आहे. यासाठी 200 कोटी रुपये निर्माते मोजणार आहेत.

green-ranbir

रणबीर कपूरचा एकही चित्रपट 2019 मध्ये आला नाही. पण यावर्षी त्याच्याकडे 300 कोटींचे दोन चित्रपट आहे. ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘शमशेरा’मध्ये तो दिसणार आहे.

ranvir-s

तर रणवीर सिंह 2018 प्रमाणे यावर्षीही धम्माल उडवणार आहे. कबीर खान यांच्या ’83’ या चित्रपटाबरोबरच  जयेश भाई जोरदार या विनोदी चित्रपटात रणवीर चमकणार आहे. यासाठी निर्मात्यांनी 200 कोटी रुपये मोजले आहेत.

salman-khan

दबंद भाई सलमान खान यावर्षीही दमदार एन्ट्री करणार आहे. 120 कोटी बजेट असलेले  राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किक 2 चेही त्याने जाहीर केले आहे.

deepika-padukone

दीपिका पदुकोणकडे175 कोटींचे दोन चित्रपट आहेत. ती मेघना गुलजार यांच्या ‘छपाक’ आणि कबीर खानच्या ’83’ या चित्रपटात दिसणार आहे.