Photo – नजर हटणार नाही, काळ्या रंगाच्य़ा गाऊनमध्ये सारा खानचा ग्लॅमरस लूक

सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान चर्चेचा विषय बनली आहे. निमित्त आहे ते रविवारी झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे. या पुरस्कार सोहळ्यातील सारा अली खानचे लूक पाहून चाहते खुश झाले आहेत. तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. यावेळी सारा अली खानने काळ्या रंगाच्या थाय हाय स्लीट हॉल्टेड नेक गाऊन घातला होता. यावेळी तिने डोळ्यांना डार्क मेकअप केला होता तर केस बन करुन तिचा लूक पूर्ण केला होता. शिवाय तिने वेगवेगळ्या पोज देत फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.