1 / 6
कधी सिनेमाच्या प्रमोशनसाठी तर कधी जनतेत मिसळण्यासाठी सेलिब्रिटी रुप बदलून सामान्य माणसांमध्ये फिरतात. मात्र, त्यांना ओळखणे कठीण होते. अशाच काही सेलिब्रिटींचे हे फोटो
विखुरलेले केस, मळलेले कपडे अशा वेशात रस्त्याच्या कडेला गाणे गाणाऱ्या सोनु निगमला अनेकांनी ओळखले नाही. रस्त्याच्या कडेला गाणे गाणाऱ्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी ही वेशभूषा केली होती.
तोंडात भरलेला पानाचा तोबरा, डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा, डोक्यावर घेतलेला पंचा अशा रुपात फिरणारा आमीर खान....पीके चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अमीर या वेशात बनारसमध्ये फिरत होता.
बिग बी अभिताभ बच्चन मॉर्निग वॉकसाठी रुप बदलून २०१६ मध्ये नवी दिल्लीत फिरत होते. तेव्हा त्यांनाही कोणी ओळखले नाही.


























































