बॉलिवूडकरांचं लाईट बिल पाहून ‘फ्यूज’ उडेल

122

सामना ऑनलाईन। मुंबई

लाईट ही सगळ्यांचीच मूलभूत गरज झाली आहे. शहरात तर विजेशिवाय पानही हलत नाही. पण या लाईटचं बिल भरणं मात्र सगळ्यांच्याच जीवावर येतं. बिल कमी आलं तर सामान्य नागरिक खुश आणि जास्त बिल आलं तर वीज कंपनीला शिव्यांची लाखोली वाहतात. पण या सगळ्यांपासून बॉलिवूडकर मात्र दूर आहेत. त्यांची लाईट बिलांची रक्कम ऐकूण मात्र तुमचा फ्यूज नक्की उडणार आहे.

सलमान खान – दबंग सलमान खानच लाईट बिल हे त्याच्यासारखंच दबंग आहे. तो महिन्याला २५ लाख रुपये लाईट बील भरतो.

कतरीना कैफ – मुंबईत राहणारी कतरीना महिन्याला १० लाख रुपये लाईट बिल भरते.

दीपिका पदुकोन – तर बॉलिवूडच्या पद्मावतीला महिन्याला १३ लाख रुपये लाईट बिल येतं.

आमिर खान – वांद्रयाला राहणाऱ्या आमिरचं महिन्याचं लाईट बिल २२ लाख रुपये आहे.

सैफ अली खान – तर सैफच्या नुसत्या केबिनचं लाईट बिल महिन्याला ३० लाख रुपये आहे

.शाहरुख खान – तर शाहरुखचं महिन्याचं लाईट बिल ४५ लाख रुपये आहे.

आपली प्रतिक्रिया द्या