
बॉलीवूड अभिनेता विकी कौशल सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असून तो नेहमी आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. आता त्याने आणखीन एक फोटो शेअर करत आपण रविवारी रेंज रोव्हर कार खरेदी केल्याची माहिती दिली आहे.
विकीने आपल्या नवीन रेंज रोव्हर कारचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत तो कारच्या समोर उभा असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘या अद्भुत अनुभवाबद्दल धन्यवाद, स्वागत आहे घरी मित्रा.’
विकीने हा फोटो शेअर केल्यानंतर आतापर्यंत 7 लाखांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. याबरोबरच बॉलिवूडमधील अनेक कलाकार अभिनेता सोफी चौधरी, जयदीप अहलावत, सयानी, अमृता खानविलकर, मुकेश छाब्रा, निमरत कौर, गजराज राव यांनी यावर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या कारची किंमत 2.10 – 4.38 लाख रुपयाच्या मध्ये आहे.
























































