
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीने आपला आगामी सिनेमा ‘विराट पर्वम’च्या प्रमोशनदरम्यान एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत साई पल्लवीने छोटे कपडे घालायला आवडतात पण ते न घालण्याबाबत खुलासा केला आहे.
साई पल्लवी सध्या तिचा आगामी सिनेमा विराट पर्वमच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्याप्रमोशनादरम्यान तिने दिलेल्या एका मुलाखतीत छोटे कपडे न घालण्याबाबत खुलासा केला आहे. मुलाखतीत साई पल्लवीने सांगितले की, असं नाहीय की तिला छोटे कपडे घालायला आवडत नाहीत. मात्र तिच्यासोबत काही असे घडले की तिने तेव्हापासून शपथच घेतली की आयुष्यात छोटे कपडे कधी घालणार नाही. साई सोशल मीडियावरील ट्रोलर्समुळे शॉर्ट ड्रेस घालायला घाबरते. साई पुढे सांगते, जॉर्जिया येथे शिक्षण घेत असताना साई टॅंगो डान्स शिकली होती. या डान्ससाठी विशिष्ट पद्धतीचे कपडे घातले जातात. त्यावेळी तिचा ‘प्रेमम’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तिच्या टॅंगो डान्सचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर फार असभ्य आणि वाईट अशा तिला प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्या वाचून तिला फार धक्का बसला होता. त्याचक्षणी साईने भविष्यात असे छोटे कपडे कधीच घालणार नाही अशी शपथच घेतली.
साई पल्लवीच्या या मुलाखतीनंतर कळंत की तिने शॉर्ट ड्रेस घातल्यावर सोशल मीडियावर ती प्रचंड ट्रोल झाली होती. साई
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखली जाते. एवढेच नाही तर साईने कोणत्याच सिनेमात बोल्ड कपडे घातलेले नाहीत. साईचा आगामी विराट पर्वम सिनेमात ती राणा दग्गुबाती याच्यासोबत दिसणार आहे.



























































