
>> किरण सोनवणे
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे (दिल्ली) माजी संचालक, मुंबईतील नेहरू केंदाचे माजी अध्यक्ष, संगीत नाटक पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते प्रा. कमलाकर सोनटक्के यांच्या ‘किमयागार कलाकार’ या पुस्तकात 1) शबाना आझमी 2) यशपाल शर्मा 3) ओम पुरी 4) सौरभ शुक्ला 5) इरफान खान 6) राजेंद्र गुप्ता 7) राजकुमार राक 8) पंकज कपूर 9) हिमानी शिकपुरी 10) सीमा किश्कास 11) अरुंधती नाग या 11 सुप्रसिद्ध कलाकारांच्या कामाचा आढावा आहे. यातील बहुतेक कलावंतांनी हालअपेष्टा भोगल्या आहेत.
ज्या कलाकंतांवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं आणि आजही करीत आहेत, त्या कलावंतांनी कलाक्षेत्रासारख्या अनवट, अनिश्चित, बेभरवशाच्या वेगळ्या वाटेचा विचार आणि स्वीकार का आणि कशासाठी केला? यात त्यांच्या अंतर्गत ओढीचा, जिद्दीचा, ऊर्जेचा किती काटा होता? त्यांच्या पालकांचा त्यांना कुठल्या प्रकारचा आधार होता किंवा विरोध होता, हेही युका वाचकांच्या आणि आपल्या मुलांना जिवापाड जपणाऱ्या पालकवर्गाच्या दृष्टीने कळणं लेखकाला अगत्याचं वाटलं. यातील बहुतेक कलाकारांनी कलाक्षेत्रात कुठलीही शाश्वती नसताना, इथं कुणाचाही आधार तर सोडा, साधी जुजबी ओळखही नसताना ही झेप घेतली. झेप केवळ अंतर्गत आवडीपोटी, कलेच्या ओढीपोटी, वेड्या साहसापोटी होती की त्याच्यासाठी त्यांचं स्वत:चं असं निश्चित काही धोरण होतं, हेही कळणं महत्त्वाचं आहे.
कलाकारांच्या कुठल्या अंगभूत गुणांचा त्या काळात त्यांना लाभ झाला? त्यांच्या धडपडण्याच्या, कष्टाने जगण्याच्या काळात त्यांना पराभूत झाल्याचा, चुकीच्या मार्गावर आल्याचा पश्चात्ताप कधी झाला का? या प्रश्नांची उत्तरंही या चरित्रांमधून मिळतात. या पुस्तकासाठी निवडलेल्या सर्वच कलावंतांची आणि त्यांच्या काही साहसी कलाकृतींची गुणवत्ता खूपच वरच्या दर्जाची आहे. यातील प्रत्येक कलावंताची सुरुवात कुठेतरी चाचपडत, धडपडतच झालेली आहे. बहुतेक कलावंत हे मध्यमवर्गीय, निम्नमध्यमवर्गीय परिवारातून आलेले आहेत. अधिकांश कलावंत हे ग्रामीण भागातून किंवा कलादृष्ट्या अप्रगत भागातून आलेले आहेत हे विशेष. यांच्यापैकी कोणाच्याही घरात तसं कलात्मक वातावरण किंवा कुठली पूर्वपरंपरा असल्याचं दिसत नाही. कुठल्यातरी आंतरिक वेडानं झपाटून हे लोक अभिनयाच्या क्षेत्राकडे ओढले गेले होते.
विशेष म्हणजे यापैकी बहुतेक कलावंतांनी अभिनयाच्या क्षेत्रात येण्यासाठी नाट्य प्रशिक्षणाचा रीतसर आणि प्रखर मार्ग चोखाळला. हिंदी चित्रपटसृष्टी ही प्रतिष्ठेची मानली जात असली तरी तिथं चढाओढ फार जिकिरीची, अटीतटीची आणि जीवघेणी असते. तिथे आपलं नाणं सिद्ध करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. वर्षानुकर्षे प्रतीक्षा करावी लागते, मात्र तुम्ही एकदा कर्तृत्व सिद्ध केलं की, मग केवळ हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीच नाही, तर जागतिक चित्रपटसृष्टीसुद्धा तुम्हाला आदराने आपली कवाडं खुली करत असते. या संग्रहातील कलावंतांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा नवनवे कीर्तिमान उभारले आहेत हे विशेष
शबाना आझमींना आपल्या ‘गंगा-जमुना’ संस्कृतीला पद्धतशीरपणे तोडण्याचा जाणीवपूर्कव प्रयत्न होत असल्याचा मनस्ताप होतो आहे. ओम पुरी नेहमीच रागावलेला, त्रस्त दिसायचा. याबद्दल तो स्वत:च सांगतो, ‘‘जीवनानं जे दिलं आयुष्यात तेच तर परत करतोय. आणखी काय करणार?’’ तो पुढे म्हणतो, ‘‘सामाजिक बांधीलकीशिकाय कुठलीही कला निरर्थक आहे.’’ सौरभ शुक्लांच्या मते अभिनय पूर्णत्क देतं. अभिनयाचं काम हे तसं खरंखोटं असतं, पण ते करावं लागतं शंभर टक्के खरेपणाने, सच्चेपणाने, सर्कस्व पणाला लावून, डोळे उघडे ठेवून. चित्रपटांच्या ट्रेंडविषयी इरफान खान म्हणतो, ‘‘प्रेक्षक आता बदलायला लागलाय. त्यांना अनकन्क्हेन्शनल चित्रपट आकडायला लागलेत. त्यासाठी त्यांचा चित्रपटगृहाकडे ओढा वाढलाय. त्यामुळे नव्या चित्रपटांकडे लोक खेचले जात आहेत.’’
आधुनिक हिंदुस्थानी रंगभूमीचे द्रष्टे दिग्दर्शक आणि लेखकांचे गुरू इब्राहिम अल्काझी यांच्या स्मृतीस अर्पण केलेल्या या पुस्तकाची भाषा साधी, सरळ, सोपी असली आणि साऱ्या नटांचा आढावा थोडक्यात घेतलेला असला, तरी त्याचा आशय गहन आणि उपयोगिता अमर्याद आहे. संस्कार, संस्कृती, ट्रेंड, समाजाच्या आकडी निकडी, बोल्डपणा, अवॉर्डस् अशा अनेकविध विषयांकर टिपण्या वाचायला मिळतात.
आनंद टिळक यांची अक्षरजुळणी, सुमित पाटील यांची रेखाचित्रे व सतीश भावसार यांचं ठळक, आकर्षक मुखपृष्ठ असलेलं हे 288 पानांचं उपयुक्त पुस्तक ‘डिंपल पब्लिकेशन’ने प्रकाशित केलेलं आहे.
किमयागार कलाकार
लेखक : प्रा. कमलाकर सोनटक्के
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन
पृष्ठ : 288, मूल्य : रुपये 400/-

























































