
राज्यातील उद्योगांना चालना देण्याबरोबरच पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन विमानतळ उभारणीची आणि विमानतळांचा विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी 212 कोटी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
कोल्हापूर विमानतळ भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. या विमानतळावरून रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम अर्थात आरसीएस उडाण योजनेंतर्गत विमान वाहतूक होते. कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.


























































