बीएसएफमध्ये 1121 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.  उमेदावार rectt.bsf.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) या पदासाठी 60 टक्के गुणांसह  12 वी उत्तीर्ण (विषय- भौतिकशास्त्र,  रसायनशास्त्र, गणित) किंवा 10 वी  उत्तीर्ण आणि दोन वर्षांची आयटीआय पदवी (पदवी-  रेडियो, टेलिव्हिज, इलेक्ट्रॉनिक्स, सीओपीए, जनरल इलेक्टॉनिक्स , डेटा एंट्री ऑपरेटर)  अशी शैक्षणिक पात्रता आहे. वयोमर्यादा 17 ते 25 वर्षे आहे.